Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता त्यावर सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्याच्या एंडिंगला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिले आहे. त्यावर आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यावर आता 31 तारखेला सुनावणी होणार आहे.
सत्तासंघर्षाच्या निकालाआधी निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता. आता निवडणूक येऊ शकतात, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तातडीने सुनावणी करावी असं ठाकरे गटाने म्हंटलं होतं. तर या ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार का किंवा काही नवीन निर्देश यावेळी देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.