मोठी बातमी! सलग दुसऱ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर, आता कधी?

आमदार अपात्र प्रकरणावरुन  सध्या राजाच्या राजकारणात  गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता याच प्रकरणासंदर्भातील अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार होती.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी 6 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. परंतु, आता ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळे पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सलग दुसऱ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आधी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावरील सुनावणीसाठी आधी 3 ऑक्टोबर, मग 6 ऑक्टोबर आणि त्यानंतर आता 9 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे.