मोठी बातमी! हमास विरुद्धच्या लढ्यात भारतीयही उतरले मैदानात

हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीला लागून असलेल्या सर्व भागांचा ताबा घेतला आहे. तसेच ३ लाखांहून अधिक राखीव सैनिकांना युद्धात सहभागी होण्यासाठी बोलवले आहे.
यासोबतच आता इस्त्रायली पत्रकारानेही देशाचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलले आहे. तर या कठीण काळात इस्त्रायल सोडण्यास एका भारतीय नर्सने नकार दिला आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने आपल्या नागरिकांना लष्करी सेवेसाठी बोलावले आहे. त्यामुळे इस्रायली पत्रकार हनान्या नफ्तालीही आपल्या देशाची सेवा करण्यासाठी गेले आहेत. त्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

तसेच कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील ४१ वर्षीय प्रमिला प्रभू या नर्स इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये राहतात. प्रमिला ७ वर्षांपासून इस्रायलमध्ये काम करत आहेत. त्यांच्या घराजवळ हमासने अनेक रॉकेट हल्ले केले आहेत. तरीही त्यांनी इस्रायल सोडण्यास नकार दिला आहे.
त्या म्हणाल्या की, भारताने तिला जन्म दिला आहे आणि इस्रायलने तिला जीवन दिले आहे, त्यामुळे या कठीण परिस्थितीत ती या लोकांना सोडणार नाही. गरज भासल्यास इस्त्रायल सरकारच्या सूचनेनुसार सेवा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रमिला यांचे कुटुंब उडुपीमध्ये राहते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे ते सतत फोन करुन त्यांची विचारपूस करत असतात.