मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. ते दिल्लीला जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते.अजित पवार आणि नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या या दिल्ली दौऱ्यात दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी अधिवेशन संपल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास दिल्लीला रवाना होतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला एका खासगी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा मुंबईसाठी रवाना होणार आहेत. या दरम्यान त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीगाठी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.