मोदींचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ.हिना गावित यांची हॅट्रिक गरजेची ! 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’चा रोडमॅप स्पष्टपणे मांडलेला राष्ट्रीय दृष्टीकोन, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती मुद्द्यांसह सर्वसमावेशक ब्लू प्रिंट आहे. त्याच्या उद्दिष्टांमध्ये आर्थिक वाढ, SDGS, राहणीमानात सुलभता, व्यवसाय करण्याची सुलभता, सुलभता यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. राहणीमान, पायाभूत सुविधा, समाजकल्याण असे विविध योजना देशात पूर्ण करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपा कडून नंदुरबार लोकसभेची उमेदवारी खासदार डॉ. हिना गावित यांना दिली आहे. ह्या वेळेस त्या विजय झाल्या तर त्यांची हॅट्रिक होणे गरजेचं आहे.

देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात भूतो न भविष्य असे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यापैकी 500 व 1000 नोटाबंदीमुळं भ्रष्टाचार, काळा पैसा, दहशतवाद, बनावट नोटा आणि देशात पसरलेली नक्षल समस्या पूर्णपणे थांबेल. तसेच 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) नियंत्रण रेषेवर सर्जिकल स्ट्राइक केलं. तसेच वस्तू आणि सेवा कर कायदा 29 मार्च 2017 रोजी संसदेत मंजूर करण्यात आला आणि 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. ‘एक राष्ट्र-एक कायदा’ या दिशेनं सरकारचं हे मोठं पाऊल मानलं जात होतं. तसेच तिहेरी तलाक कायदा 1 ऑगस्ट 2019 रोजी संसदेनं मंजूर केला. या निर्णयाचं मुस्लिम वर्गातील महिलांनी स्वागत केलं. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370 of Jammu and Kashmir) आणि कलम 35-ए रद्द करणं हा मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयांमध्ये समाविष्ट आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू केला. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या 6 समुदायांना (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी) नागरिकत्व दिलं जाणार होतं. तसेच पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एकाच वेळी अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात 200 हून अधिक दहशतवादी ठार केले. असे असंख्य निर्णय घेण्यासाठी लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खा. डॉ. हिना गावित ह्या निवडणुकीत आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित या लोकसभेवर निवडून गेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार अस्तित्वात आले, तेव्हापासूनच नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा खऱ्या अर्थाने कायापालट सुरु झाला. कधी न थांबणाऱ्या रेल्वे गाड्या नंदुरबार येथे थांबू लागल्या. थांबा मिळवण्यासाठी देखील 25 25 वर्ष वाट पाहावी लागते. परंतु डॉ हिना गावित यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने उधना ते नंदुरबार आणि नंदुरबार ते जळगाव या रेल्वेमार्गाचा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सत्तर वर्षात कधी झाला नव्हता, असा विकास सातत्याने पाठपुरावा करून करवून घेतला. तसेच नंदुरबार रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण मार्गी लावले. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या आणि सव्वाशे वर्षांचा ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या नंदुरबार रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच स्थानकावर अनेकप्रकारच्या सेवा सुविधा प्रवाशांसाठी प्राप्त करून दिल्या. जसे की, रेल्वे स्थानकावर स्टेट बँकेचे एटीएम बसवले. प्रवाशांसाठी स्थानकावर कॉईन टाकून शुध्दपाणी देणारे आरओ मशीन बववण्यात आले. प्रवाशांच्या मागणीनुसार ओखा-रामेश्वरम गाडीला थांबा मिळवून दिला, शिवाय नंदुरबार-हमसफर एक्स्प्रेस, खान्देश एक्स्प्रेस, नंदुरबार-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस अशा महत्वाच्या नवीन रेल्वेगाड्या सुरु करून नंदुरबार जिल्ह्यातील व्यापार-व्यवसाय क्षेत्राला गती मिळवून दिली. मोदी सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक अभियानांतर्गत नंदुरबार रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. या अंतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकावर चौथ्या प्लॅटफार्म बांधणीला गती मिळाली. तसेच नंदुरबार लोकसभा मतदार संघात खासदार डॉ. हिना गावित यांनी रस्तेविकासाला प्राधान्य दिले आणि पाहता पाहता मागील दहा वर्षात रस्तेविकासाचे जणू जाळे विणले गेले. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत राष्ट्रीय महामार्गांचे रस्ते तयार केले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा रस्तेविकास केला ग्रामीण दळणवळण त्यामुळे गतीमान बनले आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणाच्या हेतुने न्युक्लिअस बजेट अंतर्गत 1300 अनुसुचित बचत गटांमधील प्रत्येक महिलेला 10 हजार रुपयांचे सहाय्य मिळवून दिले. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील महिलांना यास्वरुपात कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 24 हजार 256 गरीब कामगारांना सुरक्षा देणाऱ्या सुरक्षासाहित्याचा समावेश असलेल्या पेट्यांचे वाटप करण्यात आले, तर 12 हजार 138 गरीब दुर्बल महिलांना प्रत्येकी 30 भांड्यांचा समावेश असलेले संच वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 55 हजार 350 विधवा, निराधार, परित्यक्त्या दिव्यांगजन पेन्शनचा लाभ मिळवून दिला. तसेच 1350 दिव्यांगांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या अंतर्गत भारतीय कृत्रिम साहित्य वाटपाचा लाभ देत कृत्रिम पाय, अंधांसाठी स्मार्टफोन, इलेक्ट्रिक सायकल, साधी तीन चाकी सायकल, कर्णबधीर श्रवणयंत्र, व्हीलचेअर विविध उपयोगी वस्तू वाटप केल्या. तसेच बेरोजगारांना आणि युवकांना आर्थिक आधार मिळून रोजगाराचे मार्ग मोकळे व्हावे, यासाठी मोदी सरकारने लागू केलेल्या मुद्रा योजनेतून 2015 ते 2022 या कालावधीत 39 हजार 823 खातेदारांना 130.21 कोटी रुपयांचे मुद्रा लोन म्हणजे कर्ज मंजुर करून दिले. त्यातील 126.62 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सुमारे 7 हजार 720 लाभार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार रुपये असे अर्थसहाय्य मिळवून देण्यात आले.

देशात मोदी सरकारने असंख्य कामांसोबत जनतेच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले त्याचप्रमाणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात देखील असंख्य प्रमाणावरती कामे करण्यात आले आहेत. भविष्यात देखील जनतेच्या हिताचे कामे करायची असतील तर निर्णय शक्ती घेणारे असे सरकार आले पाहिजे त्यासाठी त्यांनी उभे केलेले उमेदवार देखील निवडून येणे अत्यंत आवश्यक आहे. मोदी सरकारचे हात मजबूत करण्यासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांनी उभे करून दिलेले उमेदवार यांची देखील हॅट्रिक होणे गरजेचं आहे.