नवी दिल्ली । लोकसभा निवडणुक 2024 च्या निवडणुकांमध्ये एनडीएचा विजय झाल्यानंतर नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, हा शपथविधी उद्या रविवारी ९ जून रोजी पार पडणार आहे. पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहे.
राष्ट्रपती कार्यालयाकडून या शपथविधीची जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे.यात विशेष म्हणजे मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच रविवारी संबंधित परिसरातील विमानांना हवेत गिरड्या घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आला आहे शपथविधीच्या आधी नो फ्लाय होऊन घोषित करण्यात आले आहे. 9 जून रोजी संध्याकाळी सात वाजून 15 मिनिटांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच या ठिकाणी जबरदस्त असा पोलीस बंदोबस्त ही तैनात आहे.
बैठकांचे सत्र सुरू:
एनडीएच्या महत्त्वाच्या घटक पक्षांची बैठक संसद भावनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. या बैठकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड देखील करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांसह अमित शहा यांच्या उपस्थितीत एनडीएच्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांसोबत बैठक देखील पार पडल्या. या बैठकीमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. असेच दिवसभर एनडीएच्या या बैठकांचे सत्र सुरूच होते . यानंतर आज एनडीएच्या खाते वाटपाचा फॉर्मुला ठरणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.