मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानावर डोकं टेकवलं; पहा व्हिडिओ

दिल्लीमध्ये आज शुक्रवारी एनडीएच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीसाठी एनडीएमधील घटकपक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान, बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या सभागृहात प्रवेश करताच संविधान डोक्याला लावलं आणि नतमस्तक झाले. उपस्थितांनी यावेळी मोदी… मोदी असा जयघोष केला.

पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच संसद आणि संविधानाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्षांनी अनेकवेळा त्यांच्यावर संविधान बदलल्याचा आरोप केला असला तरी प्रत्येक वेळी त्यांनी संविधानाच्या रक्षणाचा पुनरुच्चार केला. संसदेत संविधानाच्या प्रतीसमोर नतमस्तक होऊन त्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीवरचा आपला गाढ विश्वास व्यक्त केला आहे.

यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनादेश हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे बलस्थान आहे. ते म्हणाले की, देशातील जनतेने ज्या प्रकारे एनडीएवर विश्वास दाखवला आहे ते कौतुकास्पद आहे.

पीएम मोदी म्हणाले की, आज एनडीएला देशातील 22 राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे, यावरून हे दिसून येते की आमची युती खऱ्या अर्थाने भारताचा आत्मा आहे.

ते म्हणाले की, एनडीए म्हणजे केवळ सत्ता मिळवण्यासाठी किंवा सरकार चालवण्यासाठी पक्षांचा मेळावा नाही – नेशन फर्स्ट हे आमचे पहिले प्राधान्य आहे.

पीएम मोदी म्हणाले की, एनडीए सरकारने याआधीही देशाला चांगले प्रशासन दिले आहे. एनडीए हा सुशासनाचा समानार्थी शब्द झाला आहे. आमच्या सरकारचा फोकस पूर्वीही गरीब कल्याणावर होता, भविष्यातही तसाच राहील. सामान्य जीवनात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी होईल तितकी लोकशाही मजबूत होईल, असे ते म्हणाले.