बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याकडून मिळालेल्या मोठ्या धक्क्यातून इंडिया युती सावरलेली नसतानाच महाराष्ट्रातही राजकीय फुटीची कुणकुण लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी एका सभेला संबोधित करताना मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे नितीश नंतर उद्धव यांचेही मन बदलणार का ? अश्या चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे भाजपवर हल्लाबोल करत राहिले पण पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांची भूमिका मवाळ दिसून आली. उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सभेत बोलताना ‘आम्ही पूर्वी शत्रू नव्हतो. आम्ही तुमच्या सोबत होतो. शत्रूंपासून नेहमीच तुमचे रक्षण केले आहे. शिवसेना तुमच्यासोबत होती. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.