नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील करोडो शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने किमान आधारभूत किंमत (MSP) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा 10 कोटी कुटुंबियांना होणार आहे.
विशेष म्हणजेच 2014 नंतर MSP मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. नाबार्डच्या ताज्या अहवालानुसार देशातील सुमारे 10 कोटी कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत सरकारने उचललेल्या या पावलाचा थेट परिणाम १० कोटी कुटुंबांना होणार आहे. दीर्घ कालावधीनंतर गेल्या दोन वर्षांत जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा वाढला आहे. 2020-21 या वर्षात देशाच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यापूर्वी कृषी क्षेत्राचा वाटा १७.८ टक्के होता.
एमएसपीमध्ये सर्वात मोठी वाढ
2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली MSP मधील ही सर्वात मोठी वाढ आहे. सरकारने 2024-25 च्या विपणन सत्रासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) 150 रुपयांनी वाढ करून 2,275 रुपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली आहे. प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या 5 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ
गव्हाव्यतिरिक्त, सरकारने हरभरा, बार्ली, मसूर, रेपसीड-मोहरी आणि करडईच्या एमएसपीमध्येही वाढ केली आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत गव्हाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावले उचलत आहे. यावेळी मोहरीवर 200 रुपये, मसूरवर 425 रुपये, गहू 150 रुपये, बार्ली 115 रुपये, हरभरा 105 रुपयेमोदी