मोदी सरकारने ‘हे’ मिशन ३ महिन्यांआधीच पूर्ण केले!

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दि.१३ मे रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सांगितले की, देशात ५० हजाराहून अधिक अमृत सरोवरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. भाजपने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की हे काम नियोजित वेळेपेक्षा ३ महिने आधीच झाले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनासाठी या तलावांसाठी निश्चित केलेली मर्यादा ठेवण्यात आली होती. या मोहिमेला ‘मिशन अमृत सरोवर’ असे नाव देण्यात आले.

आपल्या अधिकृत ट्विटमध्ये भाजपने म्हटले आहे की मिशन अमृत सरोवर अंतर्गत देशभरात ५०,००० हून अधिक जलाशय तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्याची सुरुवात एप्रिल २०२२ रोजी झाली. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले होते. अभियानांतर्गत या जलाशयांना अमृत सरोवर असे नाव देण्यात आले आहे. भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीच्या आधारे, भाजपचा दावा आहे की हे लक्ष्य ३ महिने आधीच पूर्ण झाले आहे.

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकून या ट्विटचे शीर्षक दिले आहे, ‘ निश्चित कालावधी आधीच प्रतिज्ञा पूर्ण झाली’. जलसंधारण आणि साठवण या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले.विशेष म्हणजे मिशन अमृत सरोवरसाठी वेगळा निधी जारी करण्यात आलेला नाही. यात भारत सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि तांत्रिक संस्थांचा सहभाग आहे. या अभियानांतर्गत सिंचन, मत्स्यपालन, बदक पालन, वॉटर चेस्टनट फार्मिंग, जल पर्यटन इत्यादीद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच अमृत सरोवराचा वापर आपल्या परिसरात सामाजिक संमेलनस्थळ म्हणून केला जाणार आहे. अमृत ​​सरोवराच्या उत्खननातील माती रेल्वे मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इत्यादींमध्ये वापरण्यासाठी पाठवली जाते.

https://twitter.com/BJP4India/status/1657371166594723840/photo/1