मोबाईलचा भीषण स्फोट; तीन जण जखमी

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। लहानापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल वापरतात.  मोबाईल हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग झाला आहे. आपल्यासोबत दिवसाचे चोवीस तास आपण मोबाईल ठेवत असतो. अगदी झोपताना सुद्धा आपल्याला मोबाईल हा लागत असतो. पण असं करणं धोकादायक आहे. याच विषययासंदर्भात नाशिक मध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मोबाईलच्या स्फोटामुळे घरातील काचा फुटल्याचं समोर आलं आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजेच्या सुमारास हि घडली असून यामध्ये तीन जण जखमी झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या स्फोट एवढा भीषण होता कि या स्फोटामुळे घराशेजारील घरं असलेल्या घराच्या काचाही फुटल्या आहेत. जखमींवर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मोबाईलचा स्फोट होण्याची कारणे
१. लोकल चार्जर वापरणे – थर्ड-पार्टी चार्जर्समध्ये हँडसेटला आवश्यक असलेले फीचर्स कमी असतात. ते सारखे दिसत असले तरी ते चूकीच्याप्रकारे चार्ज करुन फोन जास्त गरम करू शकतात, फोनच्या आतील घटक खराब करू शकतात आणि तुमच्या फोनच्या बॅटरीला खराब करु शकतात. ज्यामुळे स्फोट होऊ शकतात.

२. रात्रभर फोन चार्जिंगला लावणे –  रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवणे हे खूप धोकादायक आहे. फोनच्या अति चार्जिंग मुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.

३. प्रोसेसर ओव्हरलोड – प्रोसेसरवर लोड वाढला की आपोआपच फोन तापतो म्हणजेच बॅटरीही तापते आणि यामुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.