मोबाईलमध्ये मग्न, बघत-बघत थेट पोहचला रेल्वे रुळावर; पुढं काय घडलं

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील राम दिलीप जटाळे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे अपघातात मृत्यू झाला. मोबाईल मध्ये मग्न होऊन कानात हेडफोन टाकून तो चालत होता. पाऊलवाटेने चालताना रेल्वेरुळ आल्याचेही त्याला कळले नाही व सुसाट आलेल्या रेल्वेचा धक्का लागला आणि या विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले.

मूळ नांदेड जिल्ह्यातील किनवटचा असलेला राम आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. विवेकानंद महाविद्यालयात बारावीत त्याचा प्रवेश होता. मावस भाऊ सतीश नामदेव भुरके व गावाकडील मुलांसह तो दोन वर्षांपूर्वी आश्रमात शिक्षणानिमित्त राहण्यासाठी आला होता. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी सतीश सोबत तो शिवाजीनगर परिसरात नाश्ता करण्यासाठी गेला होता. नाश्ता करून पावणे दोनच्या सुमारास परत हॉस्टेलकडे निघाला असताना हा अपघात झाला. पण त्याच दरम्यान राम यात्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे आई-वडील शेती करतात.