धुळे : मित्राला फोन करून २० वर्षीय तरुणाने तापीत उडी घेत आत्महत्या केली. सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून उडी घेत युवकाने आत्महत्या केली. घटनानंतर तीन दिवसांनी युवकाचा मृतदेह हाती लागला. महेश श्रावण धनगर (वय २०, रा. कुरखळी, ता. शिरपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.
महेश धनगर हा एका खासगी कंपनीत नोकरीस होता. २६ फेब्रुवारीला रात्री साडेआठला कोणालाही न सांगता तो घरातून निघून गेला. यानंतर त्याने मित्र अविनाश याला फोन करून मोबाईल, चार्जर व चप्पल तापी पुलावर ठेवले. यानंतर नदीत उडी टाकत असल्याची माहिती दिली. यानंतर मित्राने त्याच्या घरी सांगितल्यानंतर सर्वजण पुलावर पोचले.
घटनेनंतर दोन दिवस शोध घेतला. मात्र मृतदेह सापडून आला नाही. ल्यानंतर २९ फेब्रुवारीला दुपारी दीडला एनएमआयएमएस संकुलाच्या शेजारी नदीपात्रात महेश धनगरचा मृतदेह तरंगताना आढळला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार पाटील तपास करीत आहेत.