तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। केरळ मधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. मोबाईल वापरण्यास विरोध केल्याने संतापलेल्या मुलाने आपल्याच आईचे डोके भिंतीवर आपटले या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील कनिचिरा येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय रुग्मिनी यांच्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यांचा मुलगा सतत मोबाइल वापरू लागल्याने आईने त्याला मोबाइल वापरण्यास विरोध केला. याचाच राग डोक्यात ठेवून मुलाने आपल्याच आईचे डोके भितींवर आपटले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.
यानंतर महिलेला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवले असता त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलाने गुन्हा मान्य केला.