मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा ९०.६० टक्के मिळवून शाळेत अव्व्ल; होतंय सर्वत्र कौतुक

कासोदा : मनात काही तरी करण्याची जिद्ध आणि चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. याचाच प्रत्यय आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेतील दहावीचा विद्यार्थी राहुल बारेला याचा रूपाने आला. नुकताच दहावीचा निकाल लागला. यात राहुल याने ९०.६० गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विशेषतः आई-वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. मोलमजुरी करणाऱ्यांचा मुलगा ९०.६० टक्के मिळवून शाळेत अव्व्ल आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आडगाव येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेचा निकाल ९४ .६२ टक्के लागला असून शेतमजुरी करणाऱ्या पावरा समाजाच्या परिवारातील राहूल भिका बारेला याने ९०.६० गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक सायली दशरथ महाजन ९०.४० यामिनी भालचंद्र मोरे ८७ .४० तुलसी गणेश पाटील ८६.८o महिमा संदीप पाटील ८६.२० कार्तिकी शांताराम पाटील ८५.८० टक्के गुण मिळवून शाळेची पंरापरा टिकवली आहे.

राहूल बारेला हा बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी एस पी पाटील यांच्या शेतात त्याचे वडिल भिका बारेला हे परिवारासह वास्तव्यात आहेत . शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे.परंतू राहूल बारेलने चिकाटी व अभ्यास करून एसएससी बोर्डाच्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला म्हणून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

त्यास एस पी पाटील यांचे मार्गदर्शन सह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर व बी एस पाटील यांनी शेतावर जाऊन त्याचा सत्कार केला . त्यावेळी त्याच्या डोळातून अश्रू येत होते . संस्थेचे अध्यक्ष शालीग्राम श्रीपत पाटील उपाध्यक्ष सुदाम पाटील कार्य ध्यक्ष भगतसिंग पाटील चिटणीस माणिकराव पाटील संचालक जयराम चौधरी रमेश पाटील अशोक कानडे मंगलबाई पाटील सर्वत्र त्याचे कौतूक व अभिनंदन होत आहे.