तरुण भारत लाईव्ह । मुरादाबाद : मोहन असं नाव सांगून हिंदू मुलीची फसवणूक करणार्या आणि तिचं धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर सक्ती करणार्या मेहरबान नावाच्या मुस्लिम तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद रेल्वे स्टेशनवरुन मेहरबान हुसैनला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे लवजिहादचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मेहरबानने त्याचं आधारकार्डही मोहन नावाने तयार केलं होतं.
मुरादाबादमधल्या रामपूरच्या भोट गावात एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने त्याचं नाव मोहन असल्याचं सांगितलं. आपण हिंदू आहोत हे तिला भासवलं त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. जेव्हा या महिलेला समजलं की मोहनचं खरं नाव मेहरबान आहे तेव्हा तिने त्याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आणले. मात्र मेहरबानने तिच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली.
मुरादाबाद स्टेशनवरुन मेहरबानला अटक करण्यात आली. या ठिकाणी एक हिंदू महिला मुस्लिम तरुणासह ट्रेनची वाट बघत होती. त्यावेळी तिथून जाणार्या आरएसएसच्या महिलेची नजर स्टेशनच्या बेंचवर बसलेल्या महिलेच्या हातावर गेली. तिच्या हातावर ओम गोंदवलेला होता. त्यानंतर तरुणाशी आरएसएस च्या महिलेने संवाद साधला ज्यावरुन तो मुस्लिम असल्याचा संशय तिला आला. काहीतरी गडबड आहे हे या महिलेच्या लक्षात आलं. या महिलेने पोलिसांना संपर्क केला आणि सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर मोहन उर्फ मेहरबान हुसैनला तातडीने अटक करण्यात आली.
भोट कस्बे में एक लड़का जो अपना नाम मोहन बताता था वो एक लड़की का पीछा करता था। जब लड़की को पता चला कि लड़का मुस्लिम है और इसका नाम मेहरबान है तब लड़की ने लड़के से दूरी बना ली। लड़के ने लड़की को धमकाया और धर्मांतरण का दबाव बनाया। लड़के ने मोहन नाम से आधार कार्ड भी बनवा लिया था।… pic.twitter.com/OD9Z972LwB
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2023