पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मोहम्मद युसूफने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती त्याने त्याच्या X हँडलवरून शेअर केली.
मोहम्मद युसूफ यांनी का दिला राजीनामा ?
मोहम्मद युसूफने पाकिस्तान क्रिकेट संघाचे निवडक पद सोडण्यामागचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले. वैयक्तिक कारणांमुळे हे पद सोडायचे असल्याचे त्यांनी सांगितले. संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्याने सांगितले.
मोहम्मद युसूफ यांची कारकीर्द
निवडकर्ता होण्यापूर्वी मोहम्मद युसूफ पाकिस्तानचा महान फलंदाज होता. त्याने पाकिस्तानसाठी 90 कसोटी, 288 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत, त्याने कसोटीत 7500 हून अधिक धावा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 10000 च्या जवळपास धावा केल्या आहेत. मोहम्मद युसूफच्या नावावर कसोटीत 24 आणि वनडेत 15 शतके आहेत. निवडकर्ता होण्यापूर्वी मोहम्मद युसूफ पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकही होते.