मौर्या ग्लोबल कंपनीला भीषण आग; २३ कामगार भाजले, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

जळगाव : एमआयडीसीमधील (मौर्या ग्लोबल लि.) केमिकल कंपनीला आज बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या कंपनीत २५ कामगार होते त्यापैकी २३ कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यात ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.  तर समाधान पाटील यांचा मृत्यू झाला असून, रामदास घाणेकर हे बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत एकूण २५ कामगार होते त्यापैकी २३ कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी सात जखमी कामगारांना प्रथम उपपचारासाठी सारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांना जळगाव जिल्हा रुग्णालयात, एकाला ओम क्रिटीकल, एकाला ख़ुशी मल्टी स्पेशिलिस्ट रुग्णलयात तर दोघांना न्यू मंगल मूर्ती रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. यात ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

 यांची प्रकृती चिंताजनक 
हेमंत गोविंद भोंगाळे (ह.मु.प्रभात कॉलनी, जळगाव),  गोपाल आत्माराम पाटील (विखरण, ह.मु.अयोद्यानगर, जळगाव), सचिन श्रावण चौधरी (रामेश्वर कॉलनी,जळगाव) दीपक वामन सुवा ( विठोबानगर, कालिंका माता, जळगाव), फिरोज तडवी (रामेश्वर कॉलनी, जळगाव)

६० ते ८० टक्के जखमी 
मयूर राजू खंगार (जुनाखेडी रोड, जळगाव), किशोर दत्तात्रे चौधरी (रामेश्वर कॉलनी, जळगाव), चंद्रकांत लक्ष्मण  पाटील ( रामेश्वर कॉलनी, जळगाव),  भिकन पुंडलिक खैरनार ( इच्छदेवी जवळ, जळगाव) तर किरकोड जखमीमध्ये नंदू छगन पवार, आनंद जगदेव, चंद्रकांत दशरत घोडेस्वार, रमेश अजमल पवार (चौघे रामेश्वर कॉलनी, जळगाव), कपिल राजेंद्र पाटील (आव्हाने, ता.जळगाव), गणेश रघुनाथ सोनवणे (सुप्रीम कॉलनी, जळगाव), विशाल रवींद्र बारी (जुने जळगाव), जगजीवन अनंत परब (अयोद्यानगर, जळगाव), नवाज अमीर तडवी (अशोक किराणा, जळगाव)