…म्हणूनच स्टेजवरून मागून गेलो; हे काय बोलून गेले अजितदादा?

पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पवारांचा आदर करतो म्हणूनच स्टेजवरून मागून गेलो. तसेच, राष्ट्रवादीवरील भ्रष्टाचारांच्या आरोपावर ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला असे ते म्हणाले. तसेच, राज्याच्या विकासासाठी आम्ही सरकारमध्ये आहोत, असेही पवारांनी सांगितले.

शरद पवारांनी जरी फोटो लावण्यास विरोध केला असला तरी आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात त्यांचा फोटो लावणार, अशी स्पष्टता अजित पवारांनी यावेळी दिली. तसेच, फोटो लावून कुणी मोठा होत नाहीतर जनतेची कामे करून मोठा होतो, असेही ते म्हणाले. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावर ते म्हणाले, याबाबत संपूर्ण अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असून तुम्ही त्यांनाच याबाबत विचारा, असेही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विश्वासाने काम करत राहणार, असेही अजित पवार म्हणाले. तसेच, पंतप्रधान मोदींबाबत बोलताना त्यांनी सांगितले, पंतप्रधान हे दिवसाचे १८ तास काम करून सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करत असल्याचा निर्वाळा अजित पवारांनी दिला.

जेवढे गरजेचे तेवढे आमदार आपल्यासोबत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच, राज्याच्या विकासासाठीच आपण राज्याच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याचा पुनरुच्चार अजित पवारांनी यावेळी केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित होते.