.. म्हणून महायुतीला पाठिंबा दिला ; राज ठाकरे यांनी सांगितले कारण

मुंबई । पाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितले.

भूमिका बदलणं आवश्यक होतं, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींचं नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली. राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यावर दिलं आहे.

मी नरेंद्र मोदी यांच्या काही धोरणांचा विरोधही केला आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संधी देणे आवश्यक आहे, असे मला वाटले. त्यामुळे पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.  लोक म्हणतात राज ठाकरे यांनी भूमिका बदलली. मी भूमिका बदलली नाही, माझ्या धोरणांवर कायम आहे, पुढच्या पाच वर्षात जे चांगलं झालं त्याच समर्थन देखील केले… असे राज ठाकरे म्हणाले.

..राममंदिर झालं नसतं!
“३७o हटले, राम मंदिर झाले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभाच राहू शकाल नसतं. ज्या कार सेवकांचा बळी गेला, त्या सगळ्या कार सेवकांचे आत्मे राम मंदिर उभे राहिल्यानंतर शांत झाले असतील, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.