यंदा जीडीपी वाढेल ६.५ टक्क्यांपर्यंत; नीती आयोगाच्या सदस्याचे मत

तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि हवामान बदलामुळे वाढलेली अनिश्चितता असूनही चालू आर्थिक वर्ष 2023 24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 6.5% पर्यंत वाढली. भारतातील सकल देशांतर्गत बचतीचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे निती आयोगाचे सदस्य अरविंद वीरमानी यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेचे बोलताना सांगितले.

ते म्हणाले माझा भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्के आहे. कारण मला वाटते की जागतिक जीडीपी मध्ये चढ-उतार कमी अधिक प्रमाणात समायोजित केले गेले आहेत. काही अमेरिकन अर्थतज्ञ भारताच्या आर्थिक वाढीचा अतिरेक करत असल्याचा दाव्यावर वीरमानी म्हणाले की माझे असे निरीक्षण आहे की काही माजी अधिकारी शैक्षणिक पृष्ठभूमीतून आलेले असल्याने जीडीपी कसा तयार करायचा हे माहीत नव्हते.

अर्थ मंत्रालयाने गेल्या आठवड्यात फुगलेल्या जीडीपी वरील टीका नाकारली होती 2022 23 साठी भारताचा आर्थिक विकासदर 7.2% होता. भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.5 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. अरविंद विरमानी म्हणाले की कच्च्या तेलाच्या किमती हा भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

जर आपण दहा वर्षांपूर्वी बोललो तर सौदी अरब आणि अमेरिका कमी अधिक प्रमाणात एकाच भूराजकीय व्यासपीठावर होते. आणि ते एकमेकांशी समन्वय साधत असतात. पण गेल्या पाच वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींनी दहा महिन्यात प्रथमच यु एस 90 प्रति बॅलरचा स्तर ओलांडला आहे. सध्या किमती सुमारे 92 डॉलर प्रति बॅरल आहेत. विरमानी यांच्या म्हणण्यानुसार अनियमाची परिस्थिती पाहत पुन्हा ऐरणीवर आली असून हवामान बदलामुळे अनिश्चितता वाढली आहे.