यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी… मुख्यमंत्रिपदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण!

Karnatka Politics : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच डी के शिवकुमार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झालाय.

शिवकुमार यांचं वाक्य काय आहे?
सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणालेत.
डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण असल्याचं बोललं जातंय. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यांच्या निर्णयाकडे काँग्रेस नेत्यांसह कर्नाटकच्या जनतेचं लक्ष लागलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांच्या नावाला शिवकुमार यांनीही संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, डीके शिवकुमार कर्नाटक प्रदेशाध्यक्षम्हणून कायम राहतील आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात दोन महत्त्वाची मंत्रालये दिली जातील असेही सांगण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी राहुल गांधी अधिकृत मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणार आहेत.