नवी दिल्ली : मागील अनेक महिण्यापासून पेट्रोलचा दर जैसे आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाहीय. अनेक शहरांमध्ये अद्यापही पेट्रोलचा दर 100 रुपयांवर आहे. देशातील बहुतांश लोक दुचाकी चालवितात. मात्र पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा अनेकांवर परिणाम होताना दिसत आहे.
अशा परिस्थितीत जर जास्त मायलेज असलेली बाईक घेतली तर बाईक चालवण्याचा खर्च कमी होऊ शकतो. जर तुम्हीही जास्त मायलेज देणारी दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील अशा 10 बाईकबद्दल सांगणार आहोत ज्या जास्तीत जास्त मायलेज देतात. चला तर मंग जाणून घेऊयात..
या आहेत 10 सर्वात मायलेज देणाऱ्या दुचाकी
— बजाज प्लॅटिना 100: मायलेज- 72 kmpl, एक्स-शोरूम किंमत- 63,130 रुपये
— TVS स्पोर्ट: मायलेज- 70 kmpl, एक्स-शोरूम किंमत- Rs 63,950
— बजाज प्लॅटिना 110: मायलेज- 70 kmpl, एक्स-शोरूम किंमत- 69,216 रुपये
— बजाज CT 110: मायलेज- 70 kmpl, एक्स-शोरूम किंमत- Rs 66,298
— TVS स्टार सिटी प्लस: मायलेज- 68 kmpl, एक्स-शोरूम किंमत- Rs 72,305
— Honda SP 125: मायलेज- 65 kmpl,एक्स-शोरूम किंमत- 82,486 रुपये
— Hero HF Deluxe: मायलेज- 65 kmpl,एक्स-शोरूम किंमत- Rs 59,890
— TVS Radeon: मायलेज- 65 kmpl, एक्स-शोरूम किंमत- Rs 59,925
— Honda CD 110 Dream: मायलेज- 65 kmpl, एक्स-शोरूम किंमत- 70,315 रुपये
— Hero Splendor Plus: मायलेज- 60 kmpl, एक्स-शोरूम किंमत- Rs 72,728