मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. त्यानुसार ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असे ठरले आहे.
त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली होती. सांस्कृतिक विभागाच्या या निर्णयाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली.