‘या’ तरुणीने हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय का घेतला?

लखनऊ : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका महिलेने घरवापसी केली आहे. हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्त्रायलमधील महिलांवर करण्यात येणारा अत्याचार पाहता तिने हा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर या महिलेने एका हिंदू मुलाशी लग्नही केले आहे.
मुस्कान सिद्दीकी असे या महिलेचे नाव असून ती २३ वर्षांची आहे. मुस्कान सिद्दीकीच्या वडिलांचे नाव इल्फात असे आहे. ती शहांजहापुरमधील कटरा येथील रहिवासी आहे. तिने हिंदू धर्म स्विकारत शिशुपाल मौर्य नावाच्या मुलाशी लग्न केले आहे. त्यामुळे मुस्कान सिद्दीकी आता मुस्कान मौर्य बनली आहे.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका कारखान्यात काम करत असताना त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी ते दोघेही विवाहबंधनात अडकले. आर्य समाजातर्फे रामकोट पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या काली मंदिरात त्या दोघांचे लग्न संपन्न झाले. गाझा पट्टीत इस्रायली महिलांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूरतेमुळे संतापलेल्या मुस्कानने हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने सांगितले आहे.