‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल? शिक्षणमंत्र्यांनी सांगितली तारीख

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. अशातच दहावी निकालाबाबत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारीख सांगितली आहे. दहावीचा निकाल देखील 27 मे पर्यंत लागेल, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

यंदाच्या बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली. या निकालानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बारावीचे विद्यार्थी चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतो,असं दीपक केसरकर म्हणाले. यावेळी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दहावीचा निकालकधी लागणार याबाबत माहिती दिली.

दहावीचा निकाल 27 मे पर्यंत लागेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया 24 तारखेपासून सुरु होत आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते तर इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया होते, असं दीपक केसरकर म्हणाले. बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोद जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदानं होणं बाकी होतं. त्यामुळं राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचं असल्यास ते बसू शकतात, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.