‘या’ बँकांमध्ये एफडी असेल तर तुम्ही 5 वर्षांत व्हाल श्रीमंत, तुम्हाला मिळतील इतके पैसे

जर तुम्हाला टॅक्स वाचवण्यासोबतच बंपर रिटर्न मिळवायचा असेल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता आणि चांगला परतावा देखील मिळवू शकता. विशेष म्हणजे, टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत सूट मिळते. म्हणजेच तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी कर भरावा लागेल. याशिवाय व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कमही मिळेल. चला तर मग आज जाणून घेऊया त्या बँकांबद्दल ज्या सध्या टॅक्स सेव्हर एफडीवर प्रचंड व्याज देत आहेत.

सध्या इंडसइंड बँक आणि येस बँक कर बचत एफडीवर बंपर व्याजदर देत आहेत. तुम्ही या दोन बँकांमध्ये टॅक्स सेव्हिंग एफडी अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.२५ टक्के व्याज मिळू शकते. जर तुम्ही आता 1.5 लाख रुपयांची टॅक्स सेव्हिंग एफडी केली तर पाच वर्षांत ही रक्कम 2.15 लाख रुपये होईल.

त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकही टॅक्स सेव्हिंग एफडीवर प्रचंड व्याज देत आहे. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये एचडीएफसी ही सर्वात मोठी बँक आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीवर ७ टक्के व्याज दिले जात आहे. जर तुम्ही आता एचडीएफसी बँकेत टॅक्स सेव्हिंग एफडी केली तर तुम्ही पाच वर्षांनी श्रीमंत व्हाल. जर तुम्ही 1.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांनी 2.12 लाख रुपये मिळतील.

जर आपण युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक बद्दल बोललो तर या दोन्ही बँका देखील कर बचत एफडीवर 6.7% पर्यंत व्याज देत आहेत. मात्र, या दोन्ही सरकारी बँका आहेत. जर तुम्ही या दोन बँकांमध्ये पाच वर्षांसाठी 1.5 लाख रुपयांची एफडी केली, तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.09 लाख रुपये मिळतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया देखील कर बचत एफडीवर 6.5% पर्यंत व्याज देत आहे. याशिवाय इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक देखील 6.5% दराने व्याज देत आहेत. जर तुम्ही या बँकांमध्ये 1.5 लाख रुपयांची पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला 2.07 लाख रुपये मिळतील.