युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती ; पगार 96,765

जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. कारण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 8 जानेवारी 2024 पासून सुरू झाली असून   इच्छुक आणि पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2023 ठेवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विभाग एकूण 250 पदांसाठी उमेदवारांची निवड करेल. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करू नये. असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

रिक्त पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी (स्केल I) च्या पदांसाठी

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवीधर असणे अनिवार्य आहे. तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

वय :  किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार : 50925/- ते 96,765/-

अर्ज फी
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील.

भरतीची अधिसूचना : पाहा
Online अर्ज: Apply Online