– गिरीश शेरेकर
Self defence for Girls शालेय व महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या विचित्र घटना दररोज राज्यातल्या कानाकोप-यातून कानावर पडतात. दिवसागणिक त्यात वाढच होत आहे. आजपर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला तर त्यातल्या बहुतांश घटना नियोजनपूर्वक आणि उर्वरित घटना तात्कालिक प्रसंगावरून घडल्याचे दिसते. Self defence for Girls अशा घटना घडण्याची कारणे वेगवेगळी असतात. प्रेम आणि त्यातून फसवणूक, विश्वासघात, एकतर्फी प्रेम किंवा हतबलता, आर्थिक व्यवहार ही त्यातली काही प्रमुख कारणे आहे. पुरेशी समज नसलेल्या आणि संभावित धोक्यांचे आकलन न करणा-या युवतींना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. पुढे त्यातून आयुष्यही उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे महाराष्ट्रात कमी नाही. आता तर प्रत्येक युवतीच्या हातात मोबाईल आल्याने संपूर्ण जगच आपल्या हातात आल्याचे अनेकींना वाटते. Self defence for Girls त्यातही समाजमाध्यमांचा त्यांच्याकडून बेमालूमपणे होणारा वापर चक्रावून टाकणारा आहे.
कोणत्याही दुष्परिणामाची चिंता त्यांना नसते. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचे बारकाईने निरीक्षण केले तर कितीतरी घटना समाजमाध्यमाच्या अतिरिक्त वापराने झाल्याचे दिसते. संताप याचा आहे की, अनेक पालक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि प्रकरण अंगाशी आल्यावर धावपळ करतात. Self defence for Girls इयत्ता आठवीपासून पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेणा-या युवतींना वर्षातून एकदा तरी सामाजिक, वैचारिक, शारीरिक स्वसंरक्षणाचे धडे देणे नितांत आवश्यक झाले आहे. त्याच अनुषंगाने राज्याच्या महिला व बालविकास विभागाने एका चांगला निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार राज्यातल्या साडेतीन लाख युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक हजार युवती असे त्याचे प्रमाण राहणार आहे. Self defence for Girls भारतीय स्त्री शक्ती, विद्यार्थी निधी ट्रस्ट आणि त्या-त्या भागातील विद्यापीठांच्या सहयोगाने हे प्रशिक्षण होणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात आले आहे. ३ जुलैला या प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री अॅड. मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला आहे.
अर्थात समाजव्यवस्थेत काम करणा-या सामाजिक संस्था व संघटनांचाही त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. राजमाता जिजाऊंचे नाव देऊन अतिशय चांगला आणि परिणाम साधणारा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करणा-या ज्या सहयोगी संस्था आहेत, त्यांनी हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात काही ठिकाणी नियोजन झाले आहे तर काही ठिकाणी ते सुरू आहे. Self defence for Girls राज्यभरातल्या युवतींची संख्या लक्षात घेता प्रशिक्षणासाठी सध्या गृहीत धरण्यात आलेल्या युवतींची संख्या तशी कमी आहे. पण, ही सुरुवात आहे आणि ती होणे अत्यंत आवश्यक होते. पुढे अनुभवाच्या आधारावर हा उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्याचा विचारही शासन करू शकते. जे आता ठरले आहे, त्यानुसार हे प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यात यशस्वी होणे आवश्यक आहे. Self defence for Girls कारण यातून प्रशिक्षित होणा-या युवती आपल्या संपर्कातल्या युवतींनाही त्याची माहिती देऊ शकतात. त्या आधारावर त्यांची आपसात चर्चा होईल. प्रत्येक मुद्दा व्यापकपणे समजून घेण्यास त्यांना मदत होईल.
शाळा व महाविद्यालयांनी यात काळजीपूर्वक लक्ष घालायला हवे. पालकांनीसुद्धा या संदर्भात व्यवस्थापनाला विचारणा करायला हवी. तालुका स्थानांवर नियोजन होत नसेल तर त्यासाठी पाठपुरावा करण्याची वेळ आली तरी पालकांनी तो करावा. समाजात घडणा-या दररोजच्या घटना वाचल्या तरी युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे किती आवश्यक आहे, याची जाणीव होते. Self defence for Girls याच प्रशिक्षणाप्रमाणे युवकांसाठी प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम शासनाने हाती घ्यायला हवा. युवतींना अडचणीत आणणा-यांमध्ये युवकांचे प्रमाण जास्त असते. त्यांना वेळीच योग्य मार्गदर्शन देऊन भानावर आणले तर समाजातल्या अनेक घटना कमी होण्यास मदत होईल. युवकांची प्रगल्भता वाढीस लागेल. समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सुधारेल. त्यामुळे शासनाने युवकांच्या प्रशिक्षणावरही गंभीरतेने विचार करावा, अशी सूचना आहे. Self defence for Girls तत्पूर्वी शासनाने व सहयोगी संस्थांनी ठरविल्यानुसार युवतींचे प्रशिक्षण यशस्वी व्हायला हवे, अशी अपेक्षा आहे.
९४२०७२१२२५