तरुण भारत लाईव्ह । ११ ऑक्टोबर २०२३। महागडी दुचाकी आणि टकाटक राहणीमानातून युवतीशी ओळख केली. तिचा विश्वास संपादन करत प्रेमाचे नाटक केले. जवळीक साधताना तिच्या सोबत फोटो काढले याच फोटोंना व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार युवतीने त्याने अत्याचार केला. वैतागलेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा धक्कादाय प्रकार समोर आला. संशयित १९ वर्षीय दानिश अकबर तडवी या संशयी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेला लव्ह जिहादची किनार असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शहरातील माध्यमिक शाळेत दोघे नववीत शिकत होते तेव्हापासून त्यांची ओळख होती सन 2021 मध्ये युवती अकरावी मध्ये उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी जाऊ लागली. हा तरुण महाविद्यालयात या युवतीला भेटण्यास वेळोवेळी जाऊ लागला. युवतीला सोबत घेत तो शहराजवळील डॅम वर फिरण्यास घेऊन गेला येथे त्याने युवतीशी गैरवर्तन करून मोबाईल मध्ये फोटो काढले. त्या तरुणाला वाट्टेल तेव्हा तो थेट महाविद्यालयात जाऊन त्या युवतीला गाठत होता. तरुणीने नकार देताच ते फोटो आहेत माझ्याकडे असा दम भरत तिला जबरीने दुजाकी वर बसवून महाविद्यालयात बाहेर तो घेऊन जाऊ लागला. हा प्रकार नेहमीचा झाला होता. ती निमुटपणे हा अत्याचार सहन करत होती.
३ डिसेंबर 2023 रोजी दुपारी महाविद्यालयात हा संशयित आला त्याने युवतीला दुचाकी वर बसवीत मेहरूण तलावांच्या झुडपात नेले त्या ठिकाणी त्याने जबरीने तिच्यावर अत्याचार केला. या किळस वाणी प्रकाराचे त्याचे फोटोही काढले. या फोटोच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेलिंग करू लागला. तरुणी महाविद्यालयात शिकण्यास शिक्षणाला जायची मात्र तिला धाक या तरुणाचा वाटत होता. तो अचानक महाविद्यालयाचा तिला महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये नेऊन तिथेही ते तिच्याशी अशोभनीय वर्तन करत होता. त्याच्या मर्जीप्रमाणे तो त्या युतीवर हक्क गाजवू लागला होता हा प्रकार जर कोणाला सांगितला तर तुझे फोटो व्हायरल करेल. असा दम भरत या प्रकारात असे या प्रकाराने युवती मनाने पार खचली होती. बदनामी होईल म्हणून ती हा सारा प्रकार इच्छा नसताना सहन करत होती .अखेर पीडितेने आपबिती कुटुंबात सांगितली. त्यानंतर पीडित व सहकुटुंबातील सदस्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर त्यात संशयित तरुणाला ताब्यात घेत अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून ही युवती या तरुणाच्या जाळ्यात अडकली होती. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. अशी तिची अवस्था झाली होती. त्याच्या धाकात तो जसं सांगेल तसं ती करीत होती. परंतु अखेर या तरुणीने हिमतीने त्या प्रकाराच्या विरुद्ध तक्रार दिली आणि अत्याचाराला वाचा फुटली त्याबरोबरच खोटा बनाव केलेला संशयताचा चेहरा समोर आला.