Crime News : उत्तर प्रदेश पोलीस गुन्हेगार आणि माफियांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करत आहेत. गुरुवारी पोलिसांच्या विशेष पथकाने (UP STF) आणखी एका गुन्हेगाराला गाडले. यावेळी गुंडाची गाडी उलटली नसून त्यांची कार झाडावर जाऊन आदळली आहे. यानंतर गुन्हेगाराला पोलिसांनी ठार केले आहे. खून आणि खुनाचा प्रयत्न अशा डझनभर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला अनिल दुजाना मेरठमध्ये चकमकीत मारला गेला आहे.
अनिल दुजाना यांच्यावर यूपीसह इतर राज्यांमध्ये सुमारे 50 खून, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल आहेत. बदलपूरचे दुजाना गाव एकेकाळी कुप्रसिद्ध सुंदर नागर उर्फ सुंदर डाकूच्या नावाने ओळखले जात होते.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दिल्ली-एनसीआरमध्ये सुंदरची भीती होती. त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अनिल नागर उर्फ अनिल दुजाना हा याच दुजाना गावचा आहे. पोलिस रेकॉर्डमध्ये त्याच्याविरोधात 2002 मध्ये, हरबीर पहेलवानच्या हत्येचा पहिला गुन्हा गाझियाबादमधील कवी नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.