यूपीमध्ये डील, मध्य प्रदेशातही सपासोबत युती, काँग्रेसने सोडली खजुराहोची जागा

उत्तर प्रदेशमधील इंडिया आघाडीमधील जागावाटपाचा करार आज निश्चित झाला. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 पैकी 63 जागा लढवणार आहे, तर काँग्रेसचे उमेदवार 17 जागांवर नशीब आजमावतील.

जागावाटपाची चर्चा अंतिम झाल्यानंतर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या नेत्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या डीलमुळे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी मजबूत होईल.

काँग्रेस-सपा नेत्यांनी सांगितले की, भारतात 2024 मध्ये युतीचे सरकार स्थापन होईल. जागावाटपाच्या माध्यमातून भाजपेतर मतांचे विखुरणे रोखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

या लोकसभा निवडणुकीत लोकशाहीवादी पक्षांना सोबत घेऊन केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपचा प्रभावीपणे पराभव करू शकतो, असे उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हटले आहे.