---Advertisement---

रक्षकच बनला भक्षक! रात्री घरात घुसला अन्… नागरिकांनी दिला बेदम चोप

---Advertisement---

मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून गावकऱ्यांनी  एका पोलिसाला बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशातील एतमादपूर पोलीस स्टेशन बर्हान परिसरात ही घटना घडली. घटनेनंतर रहिवाशांनी स्वत: स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्याच्या कृत्याची माहिती दिली. आता या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

रविवारी रात्री उशीराच्या सुमारास पोलिस असलेला संदीप हा एका गावकऱ्याच्या घरात घुसला होता. आणि त्याने घरातील मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप गावकऱ्यांनी लावला आहे. त्याच्या या कृतीमुळे पीडित मुलीने जोरात ओरडायला सुरूवात केली. तिचा आवाज ऐकून कुटुंबिय तिच्या खोलीत आले आणि त्यांनी आरोपी पोलिसाला पकडले.

आरोपी पोलिस अधिकारी हा बरहन ठाण्यात कार्यरत आहे. त्याला खांबाला बांधून मारहाणा करण्यात आल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्या पोलिस अधिकाऱ्याला एका खांबाला बांधण्यात आले असून त्याच्या अंगावर अंतर्वस्त्राशिवाय कपडे नाहीत, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काही लोकांनी त्याला मारहाणही केली. मात्र स्थानिक पोलिस तेथे पोहोचले आणि आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन संतप्त नागरिकांना दिले. आरोपी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment