---Advertisement---

रक्षाबंधनाची सुट्टी; मित्रांसोबत फिरायला गेला, काळाने केला घात

---Advertisement---

जळगाव : मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पाण्याचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. निंबादेवी धरण येथे सोमवार, १९ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत सुवर्णसिंग पाटील (२०) असे मयत तरुणाचे नाव आहे.

यावल तालुक्यातील निमगाव येथे वेदांत पाटील हा आपल्या कुटूंबियांसह वास्तव्याला होता. तो पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. रक्षाबंधनच्या सुट्टी निमित्त आपल्या मित्रांसोबत सोमवार, १९ रोजी दुपारी निंबादेवी धरण येथे फिरण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत जात असताना पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.निखिल तायडे यांनी मयत घोषित केले. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एकुलता एक, नातेवाईकांचा आक्रोश
वेदांत हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment