तरुण भारत लाईव्ह । ३० ऑगस्ट २०२३। आज रक्षाबंधन आहे. घरात काहीतरी गोड करायचं असत. तर आपण घरी पनीर रसमलाई करू शकतो. पनीर रसमलाई घरी कसे बनवतात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
दूध, साखर, कंडेंन्स मिल्क, वेलदोड्याची पूड, साय, केशर, मैदा
कृती
सर्वप्रथम, दूध उकळायला ठेवा. दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये लिंबू रस घालून दूध नासवून घ्यावे. दूध फाटल्यावर दूध थंड करायला ठेवा. त्यानंतर एका कपड्यामध्ये सैलसर पुरचुंडी बांधून टांगून ठेवा. त्यानंतर एका परातीमध्ये दूध आणि मैदा एकत्र करून नीट मळून घ्या. त्यानंतर त्या मिश्रणाचे गोल गोळे करून घ्या. यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात साखर घाला. आणि त्याचा पाक करून घ्या.
पाकला उकळी आल्यावर त्यामध्ये तयार केलेले गोळे घाला. यानंतर एका पातेल्यात कंडेंन्स मिल्क दूध घाला आणि त्यावर वेलदोड्याची पूड आणि केशर घाला त्यामध्येतयार केलेले गोळे घालून सर्व्ह करा पनीर रसमलाई.