---Advertisement---

रघुराम राजन यांनी बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली; केंद्रीय मंत्र्याचा आरोप

---Advertisement---

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन हे मोदी सरकारच्या धोरणांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते म्हणाले होते की, पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५% जीडीपी वाढ मिळवल्यास भारतासाठी भाग्यवान असेल, असा त्यांनी दावा केला होता. मात्र, अलीकडील आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये देशाचा जीडीपी वाढ ७.२% राहिली. तेव्हापासून रघुराम राजन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आता केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रघुराम राजन यांना खडेबोल सुनावले. चंद्रशेखर म्हणाले, ते अयशस्वी राजकारणी आहेत की अयशस्वी अर्थतज्ज्ञ, हे त्यांनी ठरवावं? भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्र उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारची १० वर्षे हरवलेले दशक होते आणि भ्रष्टाचाराची दुकाने पाहिली.

तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने २००४ ते २०१४ या कालावधीत पाहिले तर सर्वात योग्य वर्णन ’भ्रष्टाचाराचे दुकान’ असे होईल. हा तो काळ होता जेव्हा २जी घोटाळा झाला, Antrix-Devas घोटाळा झाला… गुंतवणूकदार भारत सोडून जात होते आणि BSNL पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.”

२००४-२०१४ चे यूपीएचे दशक वाया गेले आणि पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून सुरू झालेले दशक हे भारताच्या टेक्नोक्रॅट्सचे दशक आहे. भारत आज जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउटचा साक्षीदार आहे. आमच्याकडे उच्च पातळीवरील स्वदेशी 5G घटक आहेत, असे केंद्रीय मंत्री चंद्रशेखर म्हणाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment