शाहरुख खानने ‘डॉन’च्या दोन्ही भागांमध्ये डॉनची भूमिका साकारून जी जादू निर्माण केली होती, ती जादू वर्षांनंतरही लोकांवर कायम आहे. लोकांनाही त्याला ‘डॉन 3’मध्ये पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा होती. मात्र, गेल्या वर्षी जेव्हा बातमी आली होती की या चित्रपटात शाहरुखच्या जागी रणवीर सिंग दिसणार आहे, तेव्हा हे ऐकून किंग खानच्या सर्व चाहत्यांना हळहळ वाटली. ऑगस्ट 2023 मध्ये रणवीरचा टीझर व्हिडिओ रिलीज करताना फरहानने नवीन डॉन म्हणून त्याच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, आता हा चित्रपट बनणार नसल्याची चर्चा आहे.