चाळीसगाव : खासदार सांस्कृतिक महोत्सवातून विविध कार्यक्रमातून चाळीसगावकरांसाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करण्यात आला. खासदार उन्मेशदादा पाटील व सौ.संपदाताई पाटील यांच्या माध्यमातुन रयतेचा राजा महानाट्य, महिलाचे शिवकालीन खेळ, ढोलपथक सादरीकरण,महाआरतीतून शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते.
चाळीसगाव येथे खासदार उन्मेशदादा पाटील, संपदाताई पाटील यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवाच्या पुर्वसंध्येला शहरातील हेमंत जोशी क्रीडांगणावर राजा रयतेचा हे भव्य दिव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे माजी संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाषजी भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, खासदार उन्मेशदादा पाटील, सौ.संपदाताई पाटील, प्रदेश किसान मोर्चाचे पोपटतात्या भोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून करण्यात आले.उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी प्रास्तविक केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणाऱ्या व्यक्तींचा,संस्था, प्रतिष्ठान,शिवप्रेमी संघटनांचा शिव रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिवचरित्राचा जागर करीत आणि वर्षभर शिवरायांच्या विचारांवर काम करणाऱ्या मिञ मंडळ,संघटनाचा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी उपस्थित शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्यात.
शिव रत्न पुरस्कारार्थीचा यथोचित गौरव
याप्रसंगी सह्याद्री प्रतिष्ठान दिलीप घोरपडे व सहकारी, रयत सेना गणेश पवार व पदाधिकारी,शिवव्याख्याते गोरख ढगे सर, रक्तदान चळवळ राबवणारे सत्यम रक्तदाता ग्रुप,स्वराज्य निर्माण सेना, शिवव्याख्याते प्रदीप देसले सर,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पंकज रणदिवे, शिवव्याख्याते जयश्री रणदिवे, वारकरी संप्रदायाचे ए बी पाटील, ह.भ.प.कृष्णा महाराज चाळीसगाव ,महारॅली शक्ती ग्रुप, शिवव्याख्याते किरण चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी अक्कलकोट संस्थानच्या जयप्रभा राजे भोसले,जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्रितमदास रावलानी, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, नगरसेवक बापू अहिरे, सभापती स्मितल बोरसे,पंचायत समिती उपसभापती सुनिल पाटील,सदस्य रविभाऊ चौधरी, मार्केट सचिव जगदीश लोधे, शरदआण्णा मोराणकर, नगरसेविका विजया भिकन पवार मान्यवर उपस्थित होते.
महानाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद
शिव अभ्यासक दादा नेवे लिखित, हास्य जत्रा फेम अभिनेते हेमंत पाटील दिग्दर्शित राजा रयतेचा या महानाट्यातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. शहीद हेमंत जोशी पटांगणावर या कार्यक्रमास शहर तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीने शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला.
याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र,आचार,विचार हे कृतीत आणण्याची गरज आहे. याच विचाराने खासदार सांस्कृतिक महोत्सवातून आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक विविध कार्यक्रमाची मेजवानी उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिलो आहे. चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्ष आपल्यासमोर असून आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला या घटनेचा आम्हाला सर्वांना आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवकालीन खेळ व ढोल पथकाच्या सादरीकरणातून महाराजांना मानवंदना
उमंग महीला समाजशिल्पी परिवाराच्या माध्यमातुन सौ.संपदाताई पाटील यांनी शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील शेकडो शिवकन्या माता भगिनी यांना गेल्या महिन्याभरांपासून राज्यातील सुप्रसिद्ध प्रशिक्षकाकडून शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक व ढोल पथकांचे प्रशिक्षण दिले होते. सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर खासदार उन्मेशदादा पाटील व संपदाताई पाटील यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्रांचे पूजन करुन सादरीकरणाला सुरुवात करण्यात आली. सुमारे दोन तास उत्साहपूर्ण वातावरणात ढोल वादन सादरीकरण करण्यात आले. शिवप्रेमींना सादरीकरण बघता यावे यासाठी मोठे स्क्रिन लावण्यात आले होते.
उमंग सृष्टी परिवाराच्या संपदाताई पाटील यांनी उपस्थित शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्यात. त्या म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या युद्ध कलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केले. ही युद्ध कला पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील आत्मसात केली होती. रणांगण गाजवणाऱ्या शुर माता, माता जिजाऊ माँ साहेब, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यासारख्या शूर महिलांनी मैदान गावातून स्वराज्याचे रक्षण केलं. ही युद्ध कला हे शिवकालीन खेळाची कला आजच्या माझ्या शिवकन्या माता भगिनी यांनी आत्म संरक्षणासाठी आत्मसात करुन डिजिटल युगात आमच्या शिवकन्यांनी मराठमोळ्या परंपरा व सर्व संस्कृती रक्षण करण्याचा जो प्रयत्न केला आहे .याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते
ढोल पथकाचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात चाळीसगांवकर शिवप्रेमींनी महाआरती केली. हजारो जेष्ठ श्रेष्ठ शिवप्रेमींनी ढोल पथक व शिवकालीन खेळांचे सादरीकरण पाहण्यासाठी गर्दी केली होती. ढोल पथक सादरीकरणासाठी भूषण साळुंखे, राहुल पाटील, साधनाताई पाटील, भूषण पाटील, दिव्या मोरे, गौरी नेवतवाल, सुदर्शन कापडणे, निखिल गोंधळी, प्रवीण शिरसाठ, मयूर चव्हाण, अस्मिता पाटील, अनिल चव्हाण, मंदार नेरकर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी खासदार सांस्कृतिक महोत्सव व खासदार उन्मेशदादा पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.