रवा मसाला इडली रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। काहींना साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप आवडत. इडली सांबर, इडली चटणी, मेदू वडा, इ. पण सारखे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशावेळी तुम्ही रवा मसाला इडली बनवू शकता. रवा मसाला इडली हि घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पी आहे आणि सगळे आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. तर रवा मसाला इडली घरी कस बनवलं जात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
रवा, दही, तेल, खाण्याचा सोडा, कोथिंबीर बारीक चिरून, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मीठ.

कृती
सर्वप्रथम,एका बाऊलमधे रवा घेऊन त्यात दही  घालून अर्धी वाटी पाणी घालून कालवून पाच मिनिटे ठेवावे. तोपर्यंत फोडणी करावी. मग सोडा सोडून बाकी सगळे साहित्य घालूनमिश्रण एकजीव करावे.यानंतर कोमट झालेली फोडणी घालावी. पाणी घालून इडलीच्या पिठाप्रमाणे करावे. स्टीमरमधे पाणी घालून गरम करावे व इडली स्टँड तेलाचा हात लावून तयार ठेवा. मग मिश्रणात सोडा घालून ढवळावे. मिश्रण लगेच फुगेल. ते इडली पात्रात घालून वाफेला ठेवावे. १० मिनिटांनी गॅस बंद करावा. तयार आहे रवा मसाला इडली.