---Advertisement---
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार त्यांना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. सध्या उद्धव ठाकरेंवर आणखी एक संकट कोसळलं आहे.
नेमकी बातमी काय आहे?
आता अलिबागमध्ये असलेल्या 19 बेकायदा बंगल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर अलिबागच्या जंगलात 19 बंगले बांधल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी संबंधित विभागात तक्रारही केली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, याबाबत तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल.
रश्मी ठाकरेंची चौकशी का नाही?
मालमत्ता रश्मी ठाकरे यांच्या नावावर आहे. चौकशी सुरू आहे. तर रश्मी ठाकरे यांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, आवश्यकता नाही. तसेच चौकशी कुणाची करावी आणि कुणाची नाही हे सरकार ठरवत नाही. हे पोलीस ठरवतात. सरकार त्यात हस्तक्षेप करत नाही जसे उद्धव ठाकरे करत होते. आम्ही हस्तक्षेप केला तर सिस्टीम नीट चालणार नाही. पोलिसांना ज्याची चौकशी करायची आहे पोलीस करतली. मी एवढेच सांगतो जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
---Advertisement---