जळगाव : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहालया मिळाले. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, माझ्या नांदी लागू नका, नाही तर तुमचे सर्वांचे कपडे फाडेल. संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील आक्रमक होत म्हणाले, ‘ज्यांचे स्वतःचेच कपडे ठिकाणावर नाही त्यांनी राज्य सरकारच्या कपड्यांकडे बघू नये. पहिले स्वतः आपल्या कपड्याकडे बघावं’, असे म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.