माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आता पुन्हा लाईमलाईटमध्ये आले आहेत. याचे कारण ड्रामा क्वीन राखी सावंत. या सगळ्यात समीर वानखेडे यांनी राखीच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
काय आहे वानखेडे यांचा दावा ?
राखी आणि कासिफ यांनी आपली बदनामी केली. आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले आहे. वकील कासिफ यांच्याबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी यापूर्वी आर्यन खान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुनमुन धमेच्या बाजुनं कोर्टात बाजू मांडली होती. काशिफ यांनी सोशल मीडियावरुन आपली प्रतिमा मलीन करुन अपमान केला आहे. असे म्हणत वानखेडे यांनी मुंबईतील दिंडोशी येथील सिव्हील कोर्टात याचिका दाखल केली आहे.