बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात पोहोचले आहेत. त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. ही बैठक 40 मिनिटे चालली. नितीश कुमार यांच्यासोबत मंत्री विजय चौधरीही उपस्थित होते. बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या दिवशी राज्यपाल संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. बिहारच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू असताना नितीश कुमार राजभवनात पोहोचले आहेत.