भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. मोठी बातमी म्हणजे या सामन्यासाठी इंग्लंडने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे.
धक्कादायक निर्णय घेत इंग्लंडने पहिल्याच सामन्यात फ्लॉप खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे. इंग्लंडने वेगवान गोलंदाज मार्क वुडला संघात स्थान दिले आहे. हा वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीत खेळला आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. यानंतर त्याला विशाखापट्टणम कसोटीत वगळण्यात आले.
इंग्लंडचा संघ एका वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसह दुसऱ्या कसोटीत उतरला होता पण राजकोट कसोटीसाठी त्यांनी दोन वेगवान गोलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. स्टोक्सने ऑफस्पिनर शोएब बशीरला संघातून वगळले आहे.
इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन
जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.