मुंबई : अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे, धुळे, नंदुरबार, नाशिक शहरात गारपीटसह पाऊस झाला. मुंबईत ढगाळ वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यात गारपीट झाल्याने द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करण्याचीच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहे.” असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना आमदारांच्या अपात्रता सुनावणीवर विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या संदर्भात मी काहीच बोलू शकत नाही. त्या सुनावणीला ज्यूडिशियल आणि ट्रिब्यूनलचा दर्जा आहे. त्यावर कमेंट करणे योग्य होणार नाही.” आधुनिक डच तंत्रज्ञान आपल्याकडे आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर देशातील सस्टेनेबल शहर म्हणून नागपूरला पाहता येईल. आज सगळीकडे प्रदूषणाची समस्या आहे. इंडस्ट्रीमुळे प्रदूषण होते. मात्र त्यासोबत शहरात सुद्धा मोठं प्रदूषण निर्माण होतं. वातावरणातील बदलाला समोर जावे लागत आहे. कालचा आणि आजचा दिवस पावसाचा नव्हता. मात्र अवकाळीला समोर जावे लागत आहे. एकीकडे अवर्षण आहे तर दुसरीकडे अवकाळी आहे. असं फडणवीस म्हणाले.