नवी दिल्ली । राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये एनडीए (NDA)ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यसभेत भाजपच स्थान आणखी मजबूत झालं आहे. इतिहासात पहिल्यांदा NDA राज्यसभेत आत्मनिर्भर झाली असून आता राज्यसभेत कोणतही विधेयकं मंजूर करुन घेताना मोदी सरकाला फार अडचणी येणार नाहीत.
निवडणूक आयोगाने राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान पार पडणार होतं. तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट होती. अर्ज मागे घेण्यासाठी 27 ऑगस्ट होती. निवडणूक पार पडण्याआधीच सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यसभेचं संख्याबळ 245 आहे. यात आठ जागा रिकामी आहेत. यात जम्मू-काश्मीरच्या चार जागा आहेत. सध्या सदनाच संख्याबळ 237 आहे.
राज्यसभेत भाजपाचे 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांची संख्या 96 वरती पोहोचली आहे. सहकारी घटक पक्षांचे 16 खासदार अशी राज्यसभेत एनडीएची संख्या 112 इतकी झाली आहे. 6 मनोनीत आणि एका अपक्षाच्या समर्थनाने बहुमताचा आकडा गाठला आहे. बुहमताचा आकडा गाठण्यासाठी 119 सदस्यांची गरज असते.
आता NDA ला कोणतही विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी बीजेडी, YSR काँग्रेस, बीआरएस आणि AIADMK वर अवलंबून राहावे लागणार नाही. जेडी(यू), एनसीपी, जेडी(एस), आरपीआय(ए), शिवसेना, आरएलडी, आरएलएम, एनपीपी, पीएमके, तमिल मनीला काँग्रेस आणि यूपीपीएल हे पक्ष NDA सोबत आहेत.