---Advertisement---

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक ; आजपासून नवे दर लागू, पहा कितीने झाली वाढ?

---Advertisement---

मुंबई : सध्या राज्यात उन्हाचा पारा वाढताना दिसत असून यातच वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. मात्र अशातच राज्यातील चार वीज कंपन्यांनी वीज दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला मोठा शॉक दिला आहे. या दरवाढीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडसह , बेस्ट, अदानी आणि टाटा पावर या कंपन्यांचा समावेश आहे. आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्यांना हा मोठा झटका आहे.

घरघुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. महावितरणने आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी हा भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

इतकी झाली दरवाढ?
MSEDCL च्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे.

तर बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.

आजपासून दर लागू

आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि २१ फेब्रुवारी, २०२३ ते ०३ मार्च, २०२३ दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या. जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने ३१ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष २०२३ – २४ आणि २०२४-२५ साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येतील.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment