राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा ; जळगावात कशी राहणार स्थिती? घ्या जाणून

जळगाव । राज्यात सध्या कुठे ऊन, तर कुठे पाऊस अशी स्थिती आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसात आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडलं आहे. तर दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिख हैराण झाले आहे. दरम्यान, आज देखील राज्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील आजपासून पुढील चार दिवस तापमानाचा पारा वाढणार आहे.

उत्तर, दक्षिणेकडून हवामानात झालेल्या बदलामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडला. यानंतर मंगळवारी आभाळ स्वच्छ असल्यामुळे पुन्हा तापमान चाळिशीपार गेले. अर्थात, सोमवारच्या तुलनेत ते चार अंशांनी वाढले.  आता २४ ते २७ एप्रिल दरम्यान, कमाल तापमान ४० ते ४२ अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. मात्र २७ एप्रिलनंतर पुन्हा उष्णतेच्या लाटेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याची सुरुवात ही अत्यंत तापदायक राहण्याचा अंदाज आहे.

राज्यातील या भागात पावसाचा इशारा
हवामान खात्याने आज पुन्हा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिलेला आहे. वाशीम, धुळे, परभणी, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्ह्यातील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होतं.