जळगाव /मुंबई । राज्यवार ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचे संकट ओढवलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याला रविवारी अवकाळी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाचा झाला. जळगाव जिल्ह्यातील देखील अनेक तालुक्यांमध्ये गारपीट, वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. दरम्यान, हवामान विभागाने आज जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान मध्यम ते हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज आता तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून आळ्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली होती. यामुळे काल वातावरणात गारठा जाणवत होता.
मात्र, सायंकाळच्या वेळेस जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादम्यान, चाळीसगावसह पाचोरा, भडगाव तालुक्यातील काही ठिकाणी गारपीट तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे कपाशीसह कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे.
व्यसनीला आलेला कापूस या पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे सुरुवातीपासूनच पाऊस काळ कमी कमी होता पावसाने मारलेली दडी या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जोपासली होती परंतु रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे,
दरम्यान येत्या आठवडाभरात अवकाळीची शक्यता असल्याने शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. २९ नोव्हेंबरनंतर नियमित हिवाळा सुरू होईल. यंदा हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात पारा १० अंशांपर्यंत घसरणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.