राज्यात इतक्या नागरिकांना आले डोळे, संख्या वाचून बसेल धक्का?

मुंबई : राज्यात डोळे येण्याची साथ पसरली आहे. या आजाराच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यभरात या आजाराचे आजवर सुमारे अडीच लाख रुग्ण आढळले आहेत.

बुलढाणा जिह्यात सर्वाधिक 35 हजार रुग्ण आढळले आहेत. मुंबईतही रुग्णांची वाढ होत असून आकडा दोन हजारांजवळ पोहोचला आहे. डोळे येण्याच्या आजाराचे रुग्ण राज्यातील अनेक भागांमध्ये अचानक वाढत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

आरोग्य विभागाने आज दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरात या आजाराचे 2 लाख 48 हजार 851 रुग्ण आहेत. सहा जिह्यांमध्ये रुग्ण संख्या दहा हजारांपेक्षा जास्त तर दहा जिह्यांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

डोळे येण्याची साथ असलेल्या भागांमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. शाळेतील मुलांची नेत्रतपासणी करण्यात येत आहे. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी डोळे आलेल्या रुग्णांनी इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून कोविड रुग्णांप्रमाणे विलगीकरणात रहावे, असा सल्ला दिला आहे.